शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय अड्डा उध्वस्त, दोन पीडित महिलांची सुटका; एक संशयित आरोपी ताब्यात 

By संदीप बांद्रे | Updated: June 29, 2024 13:11 IST

चिपळूण : शहरातील मार्कंडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत एका इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर सुरू असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी ...

चिपळूण : शहरातील मार्कंडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत एका इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर सुरू असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री उध्वस्त केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. येथे दोन एजंट होते. यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून एकजण फरार झाला. महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना माहिती मिळाल्यानुसार अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक राजेंद्र कुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे व सहकारी सदर ठिकाणी गेले दोन दिवस पाळत ठेऊन होते. पोलीस कर्मचारी व गोपनीय विभागाच्या पथकाने शुक्रवारी संयुक्त कारवाई केली. यामध्ये 27 व 30 वर्षे वयाच्या दोन पीडित महिला व एक पुरुष एका सदनिकेत सापडले. पोलिसांनी त्यांना व एका एजंटला ताब्यात घेतले, तर एक एजंट पळून जाण्यात यशस्वी झाला. येथे गेले चार महिने वेषा व्यवसाय चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्वांना पोलीस स्थानकात आणून चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव, हवालदार वृशाल शेटकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कदम, राहुल दराडे, आवळे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. शहरातील काही हॉटेल व लॉजवर असे चोरटे व्यवहार होत असून त्यांचेही धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस