शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव झाले रद्द, इमारत बांधकामासाठी निधीचा मोठा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:44 IST

निकषात न बसल्याने निर्णय; बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना

रत्नागिरी : जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींची नवीन इमारत बांधकामे निकषात बसत नसल्याने रद्द करण्यात आली आहेत. ही कामे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून घेण्यात आली हाेती. इमारतींची बांधकामे रद्द झाल्याने या ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी निधी कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी ज्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना निधी देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती माताेश्री ग्रामपंचायत बांधणी योजना आखली होती. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती नादुरुस्त झाल्याने या ग्रामपंचायतींच्या इमारती नव्याने बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ४४ ग्रामपंचायतींची कार्यालये चकाचक करण्यासाठी नवीन इमारतींच्या कामांना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून मंजुरी दिली होती. 

मात्र, त्यापैकी ३३ ग्रामपंचायतींच्या इमारतींची कामे निकषात बसत नसल्याने ती रद्द करण्यात आली आहेत. या ग्रामपंचायतींना स्वत:च्या मालकीच्या इमारती असल्याने त्यांची कामे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंजूर झालेल्या कामांपैकी २ ग्रामपंचायतींची कामे सुरू आहेत. तर कर्ला आणि मजगाव ग्रामपंचायतींच्या बांधकामांना जागेची अडचण निर्माण झाल्याने या इमारतींची कामे रखडली आहेत.

किती अनुदान मिळणार?

  • एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या - १२ लाख
  • १ ते २ हजार लोकसंख्या - १८ लाख ते २० लाख
  • २ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या - १८ लाख ते २५ लाख

स्वनिधीची अट रद्दयाआधीच्या योजनेत ग्रामपंचायतींना १५ आणि २० टक्के स्वनिधीची अट घालण्यात आली होती. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींकडे इमारतच नाही त्यांना स्वनिधीसाठीही धडपड करावी लागत होती. आता ही अट रद्द करण्यात आली आहे.

कामे रद्द झालेल्या ग्रामपंचायतीतालुका - रद्द झालेली कामेमंडणगड १खेड २चिपळूण ६संगमेश्वर ८रत्नागिरी ५लांजा ६राजापूर ५७ ग्रामपंचायतींची कामे पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतfundsनिधी