जिल्हा परिषदेतील पदोन्नत्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:16+5:302021-07-04T04:21:16+5:30

रत्नागिरी : विविध खात्यांमधील पदोन्नतीचे प्रस्ताव रखडल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दुर्लक्षामुळे ...

Promotions in Zilla Parishad stalled | जिल्हा परिषदेतील पदोन्नत्या रखडल्या

जिल्हा परिषदेतील पदोन्नत्या रखडल्या

रत्नागिरी : विविध खात्यांमधील पदोन्नतीचे प्रस्ताव रखडल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दुर्लक्षामुळे या पदाेन्नत्या रखडल्याची चर्चा परिषद भवनात सुरु आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग यावर कधी कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशासनामध्ये दरवर्षी विविध पदांवर कार्यरत पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाते. राज्यभरात काही जिल्ह्यांनी पदोन्नतीने पदस्थापना करण्यास सुरुवातही केली आहे. परंतु, रत्नागिरी जिल्हा परिषदेत त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही. पदोन्नती हा प्रत्येक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नोकरीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. निवृत्तीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या अनेकांना याचा लाभ होत असतो. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या या प्रक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. त्यानुसार गतवर्षीपासून सामान्य प्रशासन पदोन्नतीचा निर्णय घेईल, या अपेक्षेने कर्मचारी प्रतीक्षा करत आहेत. पदोन्नती करण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाकडून केली जाते. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही प्रक्रिया रखडली की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Promotions in Zilla Parishad stalled