खासगी बस रस्त्यातच पेटली, सुदैवाने प्रवासी बचावले; संगमेश्वर येथील दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 08:57 IST2020-07-10T08:56:45+5:302020-07-10T08:57:28+5:30
संगमेश्वर येथील पारेख पंपाजवळ हा प्रकार शुक्रवारी सकाळी झाला

खासगी बस रस्त्यातच पेटली, सुदैवाने प्रवासी बचावले; संगमेश्वर येथील दुर्घटना
रत्नागिरी - मुंबईहून कोकणात येणारी एक खासगी आरामबास मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे अचानक पेटली. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने सर्व प्रवासी सामानासह बसमधून बाहेर पडले.
संगमेश्वर येथील पारेख पंपाजवळ हा प्रकार शुक्रवारी सकाळी झाला. मुंबईच्या साईसृष्टी ट्रॅव्हल्सची बस यात जळून खाक झाली आहे.