शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू
2
“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ
3
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
4
दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी
5
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
6
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
7
७५ रुपयांच्या शेअरचा धमाका! ₹१.२० लाखाचे झाले ₹३८ लाख, १० महिन्यांत दिला ३१००% परतावा
8
INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज
9
परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल
10
३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!
11
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
12
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
13
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
14
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
15
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
16
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
17
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
18
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
19
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
20
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका

रत्नागिरी जिल्ह्यात ४२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तिघे तडिपार 

By शोभना कांबळे | Published: April 11, 2024 5:42 PM

१.१३ कोटीची १६ लाख लिटर दारू जप्त

रत्नागिरी : आचारसंहितेनंतर प्रतिबंधात्मक कारवाईंवर अधिक भर देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १५९ जणांना अजामीनपात्र नोटीसा बजावण्यात आल्या आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तिघांना तडिपार करण्यात आले आहे. अंमली पदार्थांचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.निवडणुकीशी संबंधित गुन्हे दाखल करण्यावर अधिकाधीक भर दिला जात आहे. अवैध दारूधंद्यांवर कारवाई सुरू आहेत. या कालावधीत १११ छापे टाकण्यात आले असून त्यातून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ९३ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ९ लाख ४२ हजार ६७८ किंमतीची १०४७ लिटर हातभट्टीची दारू, ७३.४८ लिटर विदेशी दारू, ४२.४८ लिटर देशी दारू तसेच रसायन जप्त करण्यात आले आहे.तसेच अजामीनपात्र नोटीस बजावण्यावरही भर देण्यात येत आहे. पाहिजे असलेले आणि फरीरी असलेले आरोपी यांची शोध मोहीम सुरू आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने चिपळुणातील एक आणि रत्नागिरी शहरातील दोन अशा एकूण तीन जणांना तडिपार करण्यात आले आहे. अजुनही जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. त्यामुळे सर्वांनी न भिता मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने रत्नागिरी, चिपळूण, दापाेली आदी शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्येही पोलिसांचे पथसंचलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही असेच पथसंचलन करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. १.१३ कोटीची १६ लाख लिटर दारू जप्तलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात १९ मार्च रोजी कणकवली मतदार संघात १० लाख आणि २५ मार्च रोजी सावंतवाडी मतदार संघात ४ लाख अशी एकूण १४ लाख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघात मिळून १ कोटी १३ लाख ५८ हजार ३५० रूपये किंमतीची १६ लाख ३०० लिटर दारू जप्त करण्यात आली. तसेच या कालावधीत १७०० रूपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिस