रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांविरोधात आता अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आधीच्या सरपंच प्रणाली घडशी यांच्या कारकीर्दीत झालेल्या गोंधळी कारभाराबाबत याच ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश घडशी यांनी दंड थोपटले. मात्र वारंवार तक्रारी करूनही गटविकास अधिकारीही याबाबत डोळेझाकपणा करत असल्याचे दिसून आले. अखेर दोन वर्षांनी ग्रामपंचायतीचे लेखापरिक्षण झाले. त्यावेळी अनेक त्रुटी आढळून आल्या. मात्र, त्यानंतर गावविकास पॅनेलचे उमेदवार सुरेश घडशी यांच्याच गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. मात्र, नवनिर्वाचित सरपंच घडशी यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}