शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मंडणगडात गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू, वेळेत उपचार न मिळाल्याचा नातेवाइकांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:38 IST

मंडणगड : तालुक्यातील कुडुक बुद्रुक गावातील गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. विधी संदेश सावणेकर (३२) ...

मंडणगड : तालुक्यातील कुडुक बुद्रुक गावातील गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. विधी संदेश सावणेकर (३२) असे या महिलेचे नाव आहे. मंडणगड ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचाराला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आराेप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.तालुक्यातील कुडुक बुद्रुक येथील विधी सावणेकर या मुंबई येथे राहतात. काही दिवसांपूर्वीच त्या सासरी आल्या होत्या. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने नातेवाइकांनी त्यांना देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले हाेते. तिथे उपचार करून पुढील उपचाराकरिता मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात महिलेची प्रकृती अस्वस्थ बनल्याने तिला अधिक उपचाराकरिता दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.

मात्र, पुढील उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. १०८ वर फोन केला असता ही रुग्णवाहिका दापोली येथे रुग्ण घेऊन अन्य ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर १०२ ही रुग्णवाहिका देण्यात आली नाही. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिका घेऊन दापोलीला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रस्त्यातच प्रवासादरम्यान बाळासह महिलेचा मृत्यू झाला. वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, असा आराेप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.

वैद्यकीय अधिकारी म्हणतात, माहिती घेतोयासंदर्भामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता या प्रकाराबाबत माहिती घेऊन अधिक माहिती देतो, असे सांगण्यात आले. तसेच साेमवारी या प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा माेबाइल बंद हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलpregnant womanगर्भवती महिलाDeathमृत्यू