प्रकाश फातर्पेकर यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST2021-08-12T04:35:46+5:302021-08-12T04:35:46+5:30

खेड : चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या सौजन्याने व खेड तालुका मराठा सेवासंघाचे ...

Prakash Fatarpekar helps flood victims | प्रकाश फातर्पेकर यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत

प्रकाश फातर्पेकर यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत

खेड : चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या सौजन्याने व खेड तालुका मराठा सेवासंघाचे संस्थापक अध्यक्ष केशवराव भोसले यांच्या प्रयत्नातून खेड व चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले, तसेच सातारा जिल्ह्यातही वाटप करण्यात आले.

खेड तालुक्यातील गाव पोसरे, खोपी, शिंदेवाडी, ईप्तेवाडी, धनगरवाडी, शिरगाव, मिर्ले, धनगरवाडी, तिसंगी, बिजघर, कानेकरवाडी, चिंचघर प्रभुवाडी, चाकाळे, चिंचवली, तसेच चिपळूण तालुक्यातील चिपळूण बाजारपेठ, पेठमाप, चिंचघरे, गुरववाडी, भुरुणवाडी, कदमवाडी, खेडी, सती, तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, बोंडारवाडी, हातलोट, मेढा या भागांत वाटप करण्यात आले. यावेळी मुंबईच्या नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर, तसेच स्वप्निल फातर्पेकर व युवासेना राष्ट्रीय सचिव दुर्गा भोसले-शिंदे, तसेच शिवसैनिक व युवासैनिक, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Prakash Fatarpekar helps flood victims