अंघोळीसाठी गेलेल्या प्राैढाचा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:59+5:302021-03-23T04:33:59+5:30
राजापूर : तालुक्यातील शीळ म्हसोबा देवस्थान येथे अर्जुना नदीत अंघोळीसाठी नदीत उतरलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्राैढाचा बुडून ...

अंघोळीसाठी गेलेल्या प्राैढाचा नदीत बुडून मृत्यू
राजापूर : तालुक्यातील शीळ म्हसोबा देवस्थान येथे अर्जुना नदीत अंघोळीसाठी नदीत उतरलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्राैढाचा बुडून मृत्यू झाला आहे. मल्लाप्पा शिवाप्पा तेवरटी (वय ५०, सध्या रा. साखरीनाटे, राजापूर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना साेमवारी दुपारी घडली.
राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ विजापूर, कर्नाटक येथील व कामानिमित्त साखरीनाटे येथे सध्या वास्तव्याला असणारे मलाप्पा तेवरटी हे आपल्या मुलासोबत त्याच्या मित्राकडे राजापूर येथे आले होते. राजापूर शहर व शीळ सीमेवर असलेल्या म्हसोबा देवस्थान येथे अर्जुना नदीच्या पाण्यात साेमवारी दुपारी ते अंघोळीसाठी गेले हाेते. अंघोळीसाठी पाण्यात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी आनंद मल्लाप्पा तेवरटी यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, अधिक तपास ए. बी. बसवंत करत आहेत.