विजेचा खांब जमीनदाेस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:33 IST2021-05-07T04:33:41+5:302021-05-07T04:33:41+5:30

लांजा : तालुक्यातील धुंदरे येथे बेनीखुर्द - वाडगाव रोडलगत विजेच्या तारांवर झाड कोसळून मार्गालगत असणारा विजेचा खांब जमीनदोस्त झाला. ...

Power pole landlord | विजेचा खांब जमीनदाेस्त

विजेचा खांब जमीनदाेस्त

लांजा : तालुक्यातील धुंदरे येथे बेनीखुर्द - वाडगाव रोडलगत विजेच्या तारांवर झाड कोसळून मार्गालगत असणारा विजेचा खांब जमीनदोस्त झाला. त्यामुळे हा वर्दळीचा मार्ग तासभर ठप्प होता.

बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमाराला जोरदार वारे वाहू लागल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. साेसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड जमीनदोस्त झाल्याने लगतचा जीर्ण झालेला विजेचा लोखंडी खांब कोसळला. दरम्यान, सुमारे दीड तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली. त्यामुळे या परिसरातील श्री कालभैरव योगेश्वरी नगरीचा विद्युत पुरवठा खंडित झाला. मार्ग पूर्ववत करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी प्रवीण शिवगण, प्रशांत साळवी, जयेश खावडकर तसेच चंद्रकांत विचारे, मनोहर विचारे, महेश सप्रे, शेखर राठोड, शुभम शेट्ये, गोपीनाथ शेट्ये, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश हर्चेकर, वैभव नागवेकर यांनी मेहनत घेतली.

Web Title: Power pole landlord