पॉवर लिफ्टिंगमध्ये पारस खातगुणकर राष्ट्रीयस्तरावर

By Admin | Updated: July 4, 2017 19:24 IST2017-07-04T19:24:54+5:302017-07-04T19:24:54+5:30

रत्नागिरी येथील शामराव भिडे कार्यशाळेचा विद्यार्थी

Power Lifting at the National Level | पॉवर लिफ्टिंगमध्ये पारस खातगुणकर राष्ट्रीयस्तरावर

पॉवर लिफ्टिंगमध्ये पारस खातगुणकर राष्ट्रीयस्तरावर

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. 0४ : येथील शामराव भिडे कार्यशाळेच्या पारस खातगुणकर या विद्यार्थ्याची स्पेशल आॅलिंम्पिक पॉवर लिफ्टिंगसाठी राष्ट्रीयस्तरावर निवड झाली आहे. त्याच्या या निवडीचे कौतुक करण्यात येत आहे.


कोल्हापूर येथे नुकतीच स्पेशल आॅलिम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून ३० स्पर्धक सहभागी झाले होते. या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये या तीनही प्रकारांमध्ये पारस खातगुणकर याने उत्तम कामगिरी केली.

या कामगिरीमुळेच दि. ९ ते १४ जुलै दरम्यान कोल्हापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीयस्तरावरील स्पेशल आॅलिंम्पिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरिता पारसची निवड झाली आहे. पारसला झोरे अकादमीचे संजय झोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यशाळा निदेशक सचिन चव्हाण यांचेही सहकार्य लाभले.


पारसच्या यशाबद्दल कार्यशाळा व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी त्याचे विशेष कौतुक केले असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Power Lifting at the National Level