चक्रीवादळाबाबत पोलीस दलाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST2021-05-15T04:30:50+5:302021-05-15T04:30:50+5:30

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याची शक्यता ...

Police warn fishermen about cyclone | चक्रीवादळाबाबत पोलीस दलाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

चक्रीवादळाबाबत पोलीस दलाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील लोकांनी, मच्छीमारांनी सतर्क राहावे, अशी सूचना पोलीस खात्याकडूनही देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी पोलीस खात्याने किनारी भागात गस्त सुरू ठेवली होती.

हवामान खात्याकडून अरबी समुद्रात ताेक्ते चक्रीवादळ हाेणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे वादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबराेबर मच्छीमारांनाही सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी शुक्रवारी पाेलिसांनी समुद्रात गस्त घातली.

पाेलिसांनी किनारी भागात किंवा समुद्रात असणाऱ्या बोटींना किनाऱ्यालगत येऊन थांबण्याचा सूचना दिल्या. पोलिसांनी आपल्या स्पीड बोटीव्दारे समुद्रात जाऊन मच्छीमारांना सावधानतेच्या सूचना दिल्या. रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा, जयगड येथे ही मोहीम राबवण्यात आली. वादळादरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मच्छीमारांनी किनाऱ्यालगत राहावे, असे सांगण्यात आले. यावेळी गस्ती नौकेवर पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत, पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, रमेश दळवी, पोलीस नाईक राहुल गायकवड, पोलीस काॅन्स्टेबल सचिन सुर्वे व कर्मचारी होते.

Web Title: Police warn fishermen about cyclone