शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

Ratnagiri: मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक; प्रियकरासह तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:34 IST

टॅटूमुळे पटली ओळख

रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणी तिच्या प्रियकरासह त्याच्या दाेन साथीदारांनाही पाेलिसांनी अटक केली आहे. या तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी-वाटद खंडाळा, रत्नागिरी) याच्यासह बार मॅनेजर विश्वास पवार (वय ४१, रा. कळझाेंडी-बाैद्धवाडी, रत्नागिरी) आणि कारचालक सुशांत शांताराम नरळकर (वय ४०, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणीचा भाऊ हेमंत जितेंद्र मयेकर याने पाेलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.त्यानुसार भक्ती जितेंद्र मयेकर (वय २५, रा. मिरजोळे-रत्नागिरी) हिने तिच्या प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला हाेता; मात्र प्रियकराने तिच्याशी ब्रेक अप करत अन्य एका मुलीशी लग्न जमविले हाेते. आपले ठरलेले लग्न माेडेल या भीतीने भक्तीचा काटा काढण्याचे प्रियकराने ठरविले. त्यानुसार त्याने १६ ऑगस्ट राेजी तिला खंडाळा येथील बार येथे बाेलावून घेतले हाेते. त्यानंतर तिचा केबलने गळा आवळून खून केला. ती निपचित पडल्यानंतर विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांच्या मदतीने तिचा मृतदेह आंबा घाटात नेऊन टाकला.भक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल हाेताच पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवून प्रियकराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चाैकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार आंबा घाटात पाेलिसांनी मृतदेहाचा शाेध घेतला. या शाेध माेहिमेनंतर भक्तीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.याप्रकरणी पाेलिसांनी शनिवारी रात्री उशिराने तिघांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०३ (१), २३८, ६१ (२), १३८, १२७ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तिघांना ८ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी ठाेठावण्यात आली.

टॅटूमुळे पटली ओळखतब्बल १४ दिवसांनी बेपत्ता भक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत हाेता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर हाेते. मात्र, तिच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे हा मृतदेह तिचा असल्याचे स्पष्ट झाले.

गरोदर असल्याची धक्कादायक माहितीया खूनप्रकरणाचा तपास करताना तरुणी प्रेमसंबंधातून गरोदर राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावल्यानेच तिचा अडसर दूर करण्यासाठी गळा आवळून मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.