शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दापाेलीत शिकारी टाेळी जेरबंद; पोलिसांची मोठी कारवाई

By अरुण आडिवरेकर | Updated: June 18, 2023 14:49 IST

ही कारवाई शनिवारी (१७ जून) रात्री १२ ते रविवारी (१८ जून) पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान दापाेली पाेलिस स्थानकाच्या हद्दीत करण्यात आली.

 रत्नागिरी : जिल्हा पाेलिस दलातर्फे ‘ऑपरेशन ऑल आउट’ माेहीम राबवण्यात येत असून, या माेहिमेंतर्गत वन्यजीव प्राण्यांची अवैध शिकार करणाऱ्या टाेळीच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या. या टाेळीकडून १२ बाेर रायफल व १५ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (१७ जून) रात्री १२ ते रविवारी (१८ जून) पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान दापाेली पाेलिस स्थानकाच्या हद्दीत करण्यात आली.

पाेलिसांनी अक्षय बळीराम नागळकर (रा. घोडबंदर रोड, भाईंदर ठाणे), योगेश विठ्ठल तुरे (रा. टाळसुरे, दापोली), सचिन कचेर पाटील (रा. दापोडे भिवंडी, ठाणे) व कारण उर्फ बंटी शिवाजी ठाकूर (रा. भिवंडी ठाकराचा पाडा, ठाणे) या चाैघांना अटक केली आहे.खेड उपविभागामध्ये नाकाबंदी, तपासणी व गस्त घालत असताना दापोली पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये प्राण्यांची शिकार करणारी टोळी वाहनासहीत फिरत असल्याची गोपनीय माहिती खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाद्वारे दापोली येथील जंगलमय भागात गस्त घालण्यात आली. रात्री ३ वाजण्याच्या दरम्यान मौजे दळखण (ता. दापोली) या ठिकाणी एक संशयास्पद चारचाकी गाडी अंधाराचा फायदा घेत वेगाने पुढे जाताना आढळली. गाडीच्या टपावर दाेन व्यक्ती बसलेल्या हाेत्या. ही गाडी थांबवून झडती घेतली असता गाडीमध्ये अन्य दाेन व्यक्तींसह १२ बोरची रायफल व १५ जिवंत काडतुसे मिळाली. या कारवाईत पाेलिसांनी ३ लाख ३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दापाेली पाेलिस स्थानकात चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई उपविभागीय पाेलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर, दापाेलीचे पाेलिस उपनिरीक्षक गंगधर, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल एम. एच. केतकर, पाेलिस काॅन्स्टेबल विनय पाटील यांनी केली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार