शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील देहविक्री व्यवसायाप्रकरणी प्लॉट मालकाला अटक, संशयित नेपाळी महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:01 IST

प्लॉट मालकाला बजावणार नाेटीस

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी संशयित नेपाळी महिला गेल्या ४ महिन्यांपासून वास्तव्याला असल्याची माहिती पुढे आली आहे. या महिलेला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, दाेन दिवसांची पोलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. तर प्लॉट मालक सुनीलकुमार गणपत प्रभू (वय ६०) यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली.एमआयडीसी येथील ई-६९ या प्लॉटवर देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पाेलिसांनी या ठिकाणी छापा टाकून देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला. त्यावेळी संशयित नेपाळी महिलेला पाेलिसांनी अटक केली. ती पुणे येथील दोन महिलांकरवी हा देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या दोन महिलांची पाेलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्तता केली.संशयित नेपाळी महिलेविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ कायद्यांतर्गत गुन्हा करण्यात आला हाेता. तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी प्लाॅट मालकाला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली असून, पाेलिसांकडून अधिक चाैकशी सुरू आहे.प्लॉट मालकाला बजावणार नाेटीसदरम्यान, पाेलिसांनी छापा टाकलेला प्लॉट हा सुनीलकुमार गणपत प्रभू यांच्या नावावर आहे. त्यांना ताे १९९१ मध्ये इंडस्ट्रीज वापरासाठी विक्री करण्यात आला हाेता. मात्र, याठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय हाेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्यानंतर महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी प्लाॅट मालकाला मंडळाकडून नाेटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.