काजुर्ली विद्यालय परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST2021-07-19T04:20:38+5:302021-07-19T04:20:38+5:30

आबलोली : मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या गुहागर तालुक्यातील डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय, काजुर्ली या प्रशालेच्या नूतन इमारतीची माध्यमिक ...

Plantation in Kajurli Vidyalaya premises | काजुर्ली विद्यालय परिसरात वृक्षारोपण

काजुर्ली विद्यालय परिसरात वृक्षारोपण

आबलोली : मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या गुहागर तालुक्यातील डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय, काजुर्ली या प्रशालेच्या नूतन इमारतीची माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना अधिक जोमाने अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले. यावेळी विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष सुनील मयेकर, सचिव विनायक राऊत, मुख्याध्यापक अमोल पवार यांनी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी उपस्थित हाेते. शालेय कामकाज, विद्यार्थी प्रगती, सेतू अभ्यास याविषयी मुख्याध्यापक अमोल पवार यांनी माहिती दिली. संचालक किशोर पाटील, रोहित मयेकर, श्रीकांत मेहेंदळे, नंदकुमार साळवी, कैलास साळवी, चंद्रकांत खानविलकर,वासुदेव पांचाळ यांच्यासह काजुर्ली, जाकादेवी येथील शिक्षक यावेळी उपस्थित होते. विनायक राऊत यांनी आभार मानले.

Web Title: Plantation in Kajurli Vidyalaya premises