पाचलमध्ये बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST2021-06-09T04:39:10+5:302021-06-09T04:39:10+5:30
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलमध्ये गेले काही महिने बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले ...

पाचलमध्ये बिबट्याची दहशत
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलमध्ये गेले काही महिने बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने पाचल-नारकरवाडीमधील शेतकरी जयंत सीताराम तेलंग यांच्या गोठ्यात शिरून पाच वर्षांच्या पाड्याला ठार केले़ या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पाचल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरव व सरचिटणीस श्रीकृष्ण सुतार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केले आहे.
रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून पाड्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, पोलीस पाटील रवींद्र खानविलकर, तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे. शासनाने तेलंग यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी हाेत आहे़