नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध डावलून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. यासाठी गठीत केलेल्या या समितीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, वाद उफाळण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
कोकण रेल्वे मार्गाच्या रोहा ते वीर या टप्प्याचे दुपदरीकरण डिसेंबर २०२९पर्यंत, तर उर्वरित संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण २०२० पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी चिपळुणात दिली. ...
करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ...
नाणार प्रकल्पाला विरोध असतानादेखील न जुमानता नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला. ...
भ्रमणध्वनी सेवेत सुधारणा व्हावी, तसेच अति जलद सेवा मिळावी, या उद्देशाने भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून सप्टेंबर महिन्यात १२ ठिकाणी नवीन टॉवर उभारण्याच्या कामास सुरूवात झाली असून, हे काम प्रगतीपथावर आहे. ...
शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील मुस्लीम कुटुंब, पटवी हिंदू देवतांसाठी लागणारे रेशमी गोंडे आणि अनंत - अनंती गुंफण्याचा वसा गेल्या दीडशे वर्षांपासून जपत आहे. ...
रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने शहरालगतच्या कुष्ठरोग वसाहतीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी या भागाची पाहणी करून स्वच्छतेविषयी माहिती घेतली. यावेळी तेथील रूग्णांनी आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्य ...
रत्नागिरी शहरात अनंत चतुर्दशीला सात सार्वजनिक व १ हजार १७९ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गौरी-गणपती विसर्जनाच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या मूर्तींची संख्या कमी असते. ...
शिवसेना आणि स्वाभिमान पक्षातील वाद अजूनही सुरूच आहे. म्हाडा अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीटरवरून वार केला आणि पाठोपाठ उदय सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाकी पक्षांमध्ये सध्या शांतता असली तरी शिवसेना आण ...