जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षण विभाग आणि पाणी व स्वच्छता विभाग यांनी जिल्ह्यातील १३ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील ९६९ प्राथमिक शाळांमध्ये १ ...
गतवर्षी तब्बल तीन वादळे आणि नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या अतिवृष्टीचा सामना केलेल्या कोकणातील वातावरण गेल्या आठवडाभरात पूर्णपणे बदलून गेले आहे. गुरूवारी ३६ अंशांपर्यंत तापमान वाढल्याने आधीच हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक् ...
मराठी राजभाषा दिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी सायकल सफर करत मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कवी केशवसुत यांच्या जीवनप्रवासाची माहिती करून घेतली. सुमारे ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून बुधवारी येथील विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वतंत्र कक्षाला अनेक नागरिक आणि विद्यार्र्थी यांनी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शैक्षणिक संस्थांचे विद् ...
मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ...
मुंबई येथून गोव्याकडे जाणारा कंटेनर रस्ता चुकल्याने नरडवे रस्ता येथील विवेकानंद नेत्रालयासमोर चालक वळवित असताना अपघात झाला. या कंटेनरची पुढील चाके पदपथावर चढून तिथेच रुतल्याने रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद होता. ...
याआधीचा नगर परिषदेचा कोट्यवधी रुपये खर्चातून उभारलेला कचरा प्रकल्प बंद आहे. मात्र, आता नगर परिषदेने एकही रुपया खर्च न करता मुंबईतील क्लीन ऊर्जा कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्याचा धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला. ...
आईसोबत आठवडा बाजारात आलेली चार वर्षाची चिमुकली आईचा हात सुटल्यामुळे बाजारात हरवली. मात्र, दोन चाणाक्ष महिलांमुळे थोड्याचवेळात ती तिच्या आईपर्यंत पोहोचू शकली. ...
रत्नागिरी-नागपूर महामार्ग क्रमांक १६६च्या चौपदरीकरणासाठी आवश्यक जमिनीचे, मालमत्तांचे मूल्यांकन अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक बांधकामांची मूल्यांकने न झाल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. ...