शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

कणकवलीतील कोसळलेले ते बांधकाम करून देण्याचे कंपनीला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:46 PM

कणकवलीतील चौपदरीकरणाचे बांधकाम कोसळल्यानंतर या बांधकामाचा दर्जा काय प्रतीचा आहे हे उघड झाले. दरम्यान कोसळलेला भाग हा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वखर्चाने पुन्हा बांधून देण्याचे आदेश रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता स. गु. शेख यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देकणकवलीतील कोसळलेले ते बांधकाम करून देण्याचे कंपनीला आदेशरत्नागिरी:- कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे बांधकाम कोसळल्यानंतर या बांधकामाचा दर्जा काय प्रतीचा आहे हे उघड झाले. दरम्यान कोसळलेला भाग हा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वखर्चाने रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचा निर्णय

रत्नागिरी : कणकवली शहरातील चौपदरीकरणाचे बांधकाम कोसळल्यानंतर या बांधकामाचा दर्जा काय प्रतीचा आहे हे उघड झाले. दरम्यान कोसळलेला भाग हा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वखर्चाने पुन्हा बांधून देण्याचे आदेश रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता स. गु. शेख यांनी दिले आहेत.

 आदेशात असे म्हटले आहे की, मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ इंदापूर ते झाराप या ३९१.२१ कि. मी. लांबीचे रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामास केंद्र शासनाकडून तत्वतः मान्यता प्राप्त असून संदर्भादिन लांबी चौपदरीकरणाच्या भाग-१० कळमठ ते झाराप कि.मी.४०६/०३० ते ४५०/१७० (डिझाईन सा. क्र. २३७/६५५ ते २८१/५६०) एकूण लांबी ४३.९०५ कि.मी. ता. कणकवली व कुडाळ मध्ये येत असुन या लांबीमध्ये मे. डी. बी. एल. कळमठ झाराप हायवेज प्रा. लि. या कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम दि.०९.०२.२०१७ च्या करारनाम्यानुसार प्रगतीत आहे.मंजुर कामानुसार एकूण ४३.९०५ किमी लांबीपैकी ४०.२९ कि.मी. लांबीचे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम नियुक्त कंत्राटदार कंपनी यांचेकडून पूर्ण करण्यात आले आहे.

या प्रकल्पाचे कामावर देखरेख करण्यासाठी स्वतंत्र अभियंता म्हणून मे. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट लि. या कंपनीची (इंडीपेंडंट इंजिनिअर) म्हणुन नेमणुक करण्यात आली असुन प्रकल्पाच्या नकाशाना मंजुरी देणे व त्याबरहुकुम काम करुन घेण्याची पुर्णत: जबाबदारी मे. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट लि. या कंपनीच्या इंडिपेंडंट इंजिनिअर यांची आहे.

या प्रकल्पातील कुडाळ जि. सिंधुदुर्गमधील शहरी भागातील लांबी व कणकवली शहरातील ४३ गाळे असलेला १२६० मी. लांबीचा फ्लायओव्हर व पोहच मार्ग वगळता उर्वरित ९५ टक्के पुर्ण झालेले आहे. कणकवली गावामध्ये मुंबई बाजूकडील ४२९ मी. व गोवा बाजुकडील २५५ मी. पोहच मार्गाचे काम व फ्लायओव्हरचे १५ गाळ्यांचे काम मार्च २०२० अखेर प्रगतीत असताना कोवीड- १९ मुळे पुढील काम करता आले नाही.

अपूर्ण राहीलेल्या पोहच मार्गाच्या भरावामध्ये पावसाळ्यात पाणी जावून भरावाच्या दाबामुळे पोहच मार्गाच्या संरक्षक भिंतीचा ४.५० ७ २.०० मी. आकाराचा भाग दि.१३.०७.२०२० रोजी दु. २.०० वाजता पडला आहे. सदर पोहच मार्गाचे काम पूर्णतः काढून नव्याने बांधकाम करणेबाबत कंत्राटदाराच्या खर्चाने करणेबाबत लेखी सुचना देण्यात आलेल्या आहेत व इंडीपेंडंट इंजिनिअर यांनाही सुचित करण्यात आलेले आहे.

या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी प्रकल्पा दरम्याने व पुढील १५ वर्षे पूर्णत: कंत्राटदार मे. डी. बी. एल. कळमठ झाराप हायवेज प्रा. लि. यांची असुन त्यावरील देखरेखीची जबाबदारी इंडीपेंडंट इंजिनिअर मे. आर्टिफॅक्ट प्रोजेक्ट लि. यांची आहे. असे रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता स. गु. शेख यांनी दिले आहेत.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी