शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी एकच अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 17:37 IST

रत्नागिरी : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ...

रत्नागिरी : अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला, अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. पहिल्याच दिवशी ७ व्यक्तींकडून १८ अर्जांची खरेदी करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. १२ ते १९ एप्रिल या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह असल्याने त्यांच्या दालनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. उमेदवारासह पाच व्यक्तींनाच अर्ज दाखल करण्यासाठी या दालनात येता येणार आहे.पहिल्याच दिवशी शकील अब्दुल करीम सावंत या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे दाखल केला. यावेळी सावंत यांच्यासोबत चिपळूणचे ॲड. ओवेस पेचकर तसेच अन्य समर्थक उपस्थित होते.अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४