बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 23:25 IST2019-07-15T23:24:59+5:302019-07-15T23:25:05+5:30
पावस येथून मेर्वीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने झडप घालून गंभीर जखमी केले.

बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी
रत्नागिरी : पावस येथून मेर्वीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर बिबट्याने झडप घालून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजता घडली. संतोष कुरतडकर आणि मंगेश खेर्डे हे दोघे दुचाकीवरून पावस येथून मेर्वीत निघाले हाेते. त्याचवेळी गणेशगुळे येथे चालत्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात मंगेश खेर्डे गंभीर जखमी झाले आहेत. या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून हा पाचवा हल्ला आहे.