दापोलीतील 'त्या' तिघेरी हत्याकांड प्रकरणी एकास अटक, पोलिसांनी आठ दिवसात लावला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 07:38 PM2022-01-22T19:38:17+5:302022-01-22T19:39:05+5:30

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनोशी खोत वाडीत मकर संक्रांतीच्या दिवशीच तीन वयोवृध्द महिलांची हत्या झाल्याने एकच खळबळ ...

One arrested in Dapoli triple murder case, police search in eight days | दापोलीतील 'त्या' तिघेरी हत्याकांड प्रकरणी एकास अटक, पोलिसांनी आठ दिवसात लावला शोध

दापोलीतील 'त्या' तिघेरी हत्याकांड प्रकरणी एकास अटक, पोलिसांनी आठ दिवसात लावला शोध

Next

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनोशी खोत वाडीत मकर संक्रांतीच्या दिवशीच तीन वयोवृध्द महिलांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. केवळ आठ दिवसातच पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास लावला आहे. याप्रकरणी संशयित रामचंद्र शिंदे (वय-५३) याला पोलिसांनी आज, शनिवारी ताब्यात घेतले. रत्नागिरी  व दापोली पोलिसांची ही दमदार कामगिरी केली.

वनोशी खोत वाडीतील पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) व  इंदूबाई शांताराम पाटणे (८०) या तीन वयोवृद्ध महिलांचे घरातच वेगवेगळ्या खोलीत मृतदेह आढळून आले होते. यानंतर हा खून की आकस्मिक मृत्यू याबाबत चर्चेला उधाण आले होते. मात्र, पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवत तपास सुरु केला होता.
 
तर, या मृतदेहाच्या अंगावरील दीड लाखाचे दागिने गायब असल्याने दागिन्यांसाठीच या तिघींचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले होते. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाेलिसांना अंदाज व्यक्त केला होता. अखेर याप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
 

Web Title: One arrested in Dapoli triple murder case, police search in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.