शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या एकास अटक, देवरुख पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 19:29 IST

देवरुख: दुर्मिळ जातीच्या खवले मांजराची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला देवरुख पोलिसांनी देवळे फाटा देवालय या ठिकाणी सापळा ...

देवरुख: दुर्मिळ जातीच्या खवले मांजराची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला देवरुख पोलिसांनी देवळे फाटा देवालय या ठिकाणी सापळा लावून पकडले. संशयित आरोपी ललित सतीश सावंत (वय-२५, सद्या रा. पालघर, मूळ गाव मेघी पवारवाडी ता. संगमेश्वर) असे त्याचे नाव आहे. याला आज, सोमवारी मुद्देमालासह अटक करुन देवरुख न्यायालायत हजर केले असता शुक्रवार (दि.२९) पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.देवरुख पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ललित हा देवळे दरम्यान येणार असल्याची माहिती देवरुख पोलिसांना मिळाली. यानुसार देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन भुजबळराव, संतोष सडकर, रोहित यादव, ज्ञानेश्वर मांडरे, रीलेश कांबळे यांनी सापळा रचला. काल, रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास देवळे फाटा रस्त्यावर देवालय येथील प्रवेशद्वारासमोर ललित दिसून आला.यावेळी पोलिसांनी त्याच्या जवळ असलेल्या पोतलीत (पिशवीची) तपासणी केली. यावेळी यात दुर्मिळ जातीचे खवले मांजर आढळून आले. याप्रकरणी ललीतवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४८(अ) आणि ५१ नुसार देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.त्याला देवरुख न्यायालायत हजर केले असता शुक्रवार (दि.२९) पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करीत आहेत. खवले मांजराला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी