शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गुजरात ईडीच्या आदेशानेच सावर्डेच्या कात भट्ट्यांवर छापा, दोन कात व्यावसायिक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:39 IST

चिपळूण : सावर्डे परिसरातील तीन कात भट्ट्यावर नाशिक येथील वनविभागाने छापा टाकून एक गोदाम सील केले आहे, तर तिन्ही ...

चिपळूण : सावर्डे परिसरातील तीन कात भट्ट्यावर नाशिक येथील वनविभागाने छापा टाकून एक गोदाम सील केले आहे, तर तिन्ही ठिकाणची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणी गुजरात ईडी कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर ही धडक कारवाई केल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे चिपळुणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन कात व्यावसायिक अजून पसार असून, त्यांच्यावर वन विभागाकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.नाशिक हवेत येथे विनापरवाना खैरतोड करून येथील खैराचे लाकूड सावर्डेमध्ये आणल्याचा नाशिक वनविभागाचा संशय आहे. त्यानुसार मंगळवारी दिवसभर छापा टाकण्यात आला. दहिवली सावर्डे परिसरातील तीन कात भट्ट्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खैराचे लाकूड तसेच तयार केलेला ज्यूस आणि कात वनविभागाने जप्त केला आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी दहशतवादविरोधी पथकाने धाड टाकून खैरसाठा जप्त केला होता. याप्रकरणात सावर्डे येथील दोघांना अटक केली होती. दहशतवादी संघटनेची संबंध ठेवल्याचा संशय या दोघांवर होता. यातून ही कारवाई झाली होती.

आता पुन्हा एकदा नाशिक वनविभागाने कारवाई केल्यानंतर कात उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. हा छापा गुजरात येथील ईडीच्या आदेशाने झाल्याचे नाशिक येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणते वळण घेणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात चिपळूणच्या विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबाबत फारशी माहिती नाही. ही कारवाई नाशिक वनविभागाने केलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे याबाबतची फारशी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयGujaratगुजरातforest departmentवनविभाग