कशेळी येथे झालेल्या हाणामारीतील ‘त्या’ जखमी वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST2021-05-09T04:31:46+5:302021-05-09T04:31:46+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : सामाईक जमिनीच्या वाटप हिश्श्यावरून सख्ख्या भावाने धारदार सुऱ्याने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील ...

The old man who was injured in the clash at Kasheli died | कशेळी येथे झालेल्या हाणामारीतील ‘त्या’ जखमी वृद्धाचा मृत्यू

कशेळी येथे झालेल्या हाणामारीतील ‘त्या’ जखमी वृद्धाचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : सामाईक जमिनीच्या वाटप हिश्श्यावरून सख्ख्या भावाने धारदार सुऱ्याने वार केल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील कशेळी सावरेवाडी येथे गुरुवारी दुपारी घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शांताराम जानू ठुकरूल (७८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी महादेव जानू ठुकरूल (६८) याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशेळी सावरेवाडी येथील महादेव ठुकरूल व शांताराम ठुकरूल या दोन भावांमध्ये सामाईक जमिनीच्या वाटपावरून गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वाद झाला. या वादातून महादेव ठुकरूल याने शांताराम ठुकरूल यांच्यावर धारदार सुऱ्याने डोक्यावर व पायावर वार केले. यामध्ये शांताराम ठुकरूल गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले़

याबाबत उत्कर्ष अरविंद ठुकरूल यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर नाटे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेनंतर महादेव ठुकरूल यांनी जंगलात पळ काढला होता. नाटे पोलिसांनी त्याला जंगलातून पकडून आणले. याकामी नाटेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, गोपनीय अंमलदार दीपक काळे, सहायक फौजदार विवेक साळवी, पोलीस नाईक दिनेश कांबळे, हवालदार नरेंद्र जाधव, चालक प्रसाद शिवलकर यांनी काम पाहिले. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीनिवास साळुंखे व फॉरेन्सिक युनिट दाखल झाले होते.

Web Title: The old man who was injured in the clash at Kasheli died