शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याने अधिकाऱ्याकडेच मागितली लाच, तिघांना रंगेहाथ पकडले; रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:09 IST

अंतिम अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी

रत्नागिरी : लेखा परीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी एका अधिकाऱ्याकडे १६,५०० रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक प्रकार रत्नागिरीत समाेर आला आहे. ही लाच स्वीकारताना स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील सहायक संचालकासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहायक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले.स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहायक संचालक शरद रघुनाथ जाधव (वय ५३), जिल्हा परिषद वित्त विभागातील सहायक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये (वय ४५) आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी (वय ३८) अशी कारवाई करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात दापोली पंचायत समितीच्या सहायक लेखा अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती.त्यानुसार, त्यांच्या कार्यालयाचे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण रत्नागिरीतील स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयामार्फत करण्यात आले होते. या अहवालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून त्यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी अनुपाल अहवाल सादर केला होता. हा अहवाल अंतिम करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी ५ ऑगस्ट रोजी सहायक संचालक आणि कंत्राटी शिपाई यांची भेट घेतली. त्यावेळी २१ मुद्दे वगळून अंतिम अहवाल देण्यासाठी सहायक संचालकांच्या वतीने शिपायाने तक्रारदाराकडे २४ हजारांच्या लाचेची मागणी केली हाेती.या लाच मागणीविरोधात तक्रारदाराने ११ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रार दिली हाेती. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सहायक संचालकांच्या संमतीने कंत्राटी शिपायाने तक्रारदाराकडून १६,५०० रुपयांची लाच स्वीकारून ती रक्कम तत्काळ जिल्हा परिषदेचे सहायक लेखा अधिकारी यांच्याकडे दिली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.ही कारवाई रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुहास रोकडे, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक पोलिस फौजदार उदय चांदणे, पोलिस हवालदार विशाल नलावडे, संजय वाघाटे, दीपक आंबेकर, पोलिस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांनी केली.

सत्यता पडताळली अन् सापळा रचलालाचलुचपत विभागाने तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर लेखा परीक्षण अहवालामधील प्रलंबित असलेल्या २१ मुद्द्यांपैकी १५ मुद्दे वळगून तसा अहवाल देण्यासाठी तक्रारदाराकडे तडजोडीअंती १६,५०० रुपयांची लाच घेण्याचे ठरल्याचे पुढे आले हाेते. गुरुवारी सायंकाळी ७:४६ वाजण्याच्या सुमाराला स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.