शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
3
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
4
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
5
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
6
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
7
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
8
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
9
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
10
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
11
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
12
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
13
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
14
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
15
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
16
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
17
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
18
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
19
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
20
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘जीडीसी अँड ए’ परीक्षेसाठी आता रत्नागिरीतही केंद्र, कोकणातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:31 IST

कोकण विभागात यापूर्वी ठाणे हे एकमेव परीक्षा केंद्र होते

रत्नागिरी : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘शासकीय सहकार व लेखा पदविका’ (G.D.C.& A.) आणि ‘सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र’ (C.H.M.) परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. २६ ते २८ मे या कालावधीत होणाऱ्या या परीक्षांसाठी आता पहिल्यांदाच रत्नागिरी येथे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ९ जानेवारी ते २३ फेब्रुवारी अशी आहे.कोकण विभागात यापूर्वी ठाणे हे एकमेव परीक्षा केंद्र होते. त्यामुळे कोकणातील इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ठाण्याला जावे लागत असे. मात्र, मे २०२६ च्या परीक्षेसाठी संगणक प्रणालीमध्ये ‘रत्नागिरी’ हे १७ वे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडसाठी पहिल्यांदाच कोणतीही पदवी असलेल्या इच्छुक व्यक्तींना ही परीक्षा देण्यासाठी रत्नागिरी येथे सुविधा उपलब्ध झाली आहे.२६, २७ व २८ मे या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ९ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावेत. रत्नागिरी येथे केंद्र उपलब्ध झाल्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना केंद्राच्या रकान्यात ‘रत्नागिरी’ या केंद्राची नोंद करावी, असे आवाहन केंद्रप्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. तसेच साहेबराव पाटील (सहायक निबंधक- प्रशासन), लक्ष्मीकांत केतकर यांच्याशी संपर्क करावा. कोकणातील परीक्षार्थींसाठी सुरू करण्यात आलेल्या रत्नागिरी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Now a Center for GDCA Exam, Relief for Konkan Students

Web Summary : Ratnagiri becomes a new exam center for GDCA, CHM exams, benefiting Konkan students. Exams are from May 26-28. Apply by February 23, 2026. This eliminates the need to travel to Thane.