शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

रिफायनरीसाठी आता राजापूर तालुक्याचाच पर्याय : अविनाश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 6:10 PM

nanar refinery project, Rajapur, Uddhav Thackeray, Ratnagirinews रिफायनरी प्रकल्प राजापुरातून रायगडला हलविण्याच्या हालचाली सुरू असताना आता या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत आरक्षित जमिनीपैकी ५ हजार एकर क्षेत्रात औषध निर्माण उद्यान विकसित करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे या परिसरात रिफायनरी होण्याच्या आशा धुसर झाल्या असून, आता राजापूर हा एकमेव पर्याय राहिला आहे.

ठळक मुद्दे रिफायनरीसाठी आता राजापूर तालुक्याचाच पर्याय : अविनाश महाजनरायगड जिल्ह्याचा पर्याय बारगळला, तेथे होणार औषध निर्माण उद्यान

राजापूर : रिफायनरी प्रकल्प राजापुरातून रायगडला हलविण्याच्या हालचाली सुरू असताना आता या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत आरक्षित जमिनीपैकी ५ हजार एकर क्षेत्रात औषध निर्माण उद्यान विकसित करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे या परिसरात रिफायनरी होण्याच्या आशा धुसर झाल्या असून, आता राजापूर हा एकमेव पर्याय राहिला आहे.

ठाकरे सरकारने राजापूरच नव्हे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या मागणीचा विचार करून लवकरात लवकर राजापुरात रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवावी, असे आवाहन कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अविनाश महाजन यांनी केले आहे.सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन आŸईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने सुमारे ३ लाख कोटींचा भव्य तेलशुध्दीकरण प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार व लगतच्या गावांमध्ये उभारण्यात येणार होता. परंतु शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध करून युती करण्यासाठी हा प्रकल्प रद्द करण्याची अट भाजपला घातली. त्यात हा प्रकल्प रायगडला हलविण्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याला जनतेने तीव्र विरोध दर्शविताना रायगडला रिफायनरी चालते, मग राजापूरला का नको, असा सवाल उपस्थित केला होता.या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत रोहा, अलिबाग, मुरूड तालुक्यातील आरक्षित केलेल्या जमिनीपैकी पाच हजार एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात औषध निर्माण उद्यान विकसित करण्याचा निर्णय विद्यमान शासनाने घेतला आहे. तसेच रोह्यातील रिफायनरीसाठीचे इतर क्षेत्रही अनारक्षित करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रायगड येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याची शक्यता मावळली आहे.आता रिफायनरीसाठी राजापूर हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यासाठी स्थानिकांनी सुमारे साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे शासनाला सादर केली आहेत. सध्या रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता कितीतरी पटीने वाढली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिफायनरी मार्गी लागावा, अशी येथील जनतेची मागणी आहे. ठाकरे सरकारने या मागणीचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीRajapurराजापुरUddhav Thackerayउद्धव ठाकरे