शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

...यापुढे कोणाचीही दहशत चालवून घेणार नाही

By admin | Updated: October 18, 2015 23:57 IST

राजन तेली : वेंगुर्लेतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी नितेश राणेंची सारवासारव

वैभववाडी : केंद्रात आणि राज्यात भाजप, शिवसेनेची सत्ता असल्याने नगरपंचायतीचा विकास आम्हीच करु शकतो. आम्ही कोणाचीही दहशत जिल्ह्यात चालू देणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या भूलथापा आणि दहशतीला जनतेने बळी पडू नये, असे आवाहन करत वेंगुर्ले राड्याच्या परिणामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आमदार नितेश राणे व्यापाऱ्यांना बोलावून सारवासारव करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केला.येथील भाजप कार्यालयात तेलींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे, सज्जनराव रावराणे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सरचिटणीस राजेंद्र्र राणे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक रावराणे, राजन चिके, मंगेश लोके आदी उपस्थित होते.तेली म्हणाले की, वेंगुर्लेतील राड्याची किंमत काँग्रेसला सावंतवाडी पालिकेतही मोजावी लागली होती. त्यामुळे तशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून काहीतरी वदवून घेतले गेले. परंतु, पोलीस आणि प्रशासनाने सज्जनरावांच्या धमकी प्रकरणाची योग्य दखल घेतली आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हावी, अशी आमची इच्छा आहे. ७0 वर्षीय सज्जनराव बालिश? की त्यांना धमकवायला लावणारे बालिश? याचे उत्तर येथील जनता नक्कीच देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांना नगरविकासाची नस माहीत आहे. त्यामुळे नगरांच्या विकासाला पैसे कमी पडणार नाहीत असे धोरण राज्य सरकारने आणले आहे. त्यामुळे वैभववाडी आणि दोडामार्ग नगरपंचायतींचा विकास व्हायचा असेल तर युतीच्या हातात येथील सत्ता असली पाहिजे. प्रत्येक वर्षात मिळणारे २ कोटी २00 गावांना वाटून आमदार राणे वैभववाडी नगरपंचायतीचा विकास कसा करणार? १५ वर्षे काँग्रेसची सत्ता असताना कणकवली नगरपंचायतीची किती आरक्षणे काँग्रेसने विकसित केली, असा सवाल करत सत्ता असताना जे शक्य झाले नाही ते विरोधी बाकांवर बसून विकास कसा करणार आहेत. याचा विचार मतदारांनी करावा, असे आवाहन तेली यांनी यावेळी बोलताना केले. (प्रतिनिधी)...तर आश्चर्य वाटायला नको !प्रभाग क्रमांक ३ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार कोंडीबा काळे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांवर काँग्रेस दबाव टाकत आहे. त्यामुळे काळे कुटुंबिय सध्या दडपणाखाली आहे. परंतु, काळेंचे वडील जिल्हा बँकेचे कर्मचारी असल्याने तक्रार देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोंडीबा काळे यांनी उद्या नामनिर्देशनपत्र मागे घेतले तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीप्पणी राजन तेली यांनी केली.