शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

दापोली नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव; उद्धवसेनेसाठी धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:58 IST

उद्धवसेनेचा एकच नगरसेवक

दापोली : दापोली नगर पंचायतीमधील उद्धवसेनेतील नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश करताच नगराध्यक्षा ममता माेरे यांच्याविराेधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. शिंदेसेनेच्या गटनेत्यांसह नगरसेवक आणि शहरप्रमुखांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे.गटनेत्या  शिवानी खानविलकर, नगरसेवक विलास शिगवण, नगरसेवक आजीम चिपळूणकर, शिंदेसेनेचे शहरप्रमुख  प्रसाद  रेळेकर यांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्या प्रयत्नातून उद्धव सेनेच्या १२ नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सत्ता बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष ममता माेरे यांच्या विराेधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

उद्धवसेनेचा एकच नगरसेवक राहिल्याने ममता माेरे यांचे पद धाेक्यात आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी कृपा घाग तर, उपनगराध्यक्ष पदासाठी विलास शिगवण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना