शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

रत्नागिरीत नीलेश राणे पुरस्कृत गुंडगिरी - विनायक राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 1:33 PM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शांततेला स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या गुंडगिरी व झुंडशाहीमुळे गालबोट लागले आहे.

रत्नागिरी : गेल्या चार वर्षात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शांततेला स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या गुंडगिरी व झुंडशाहीमुळे गालबोट लागले आहे. या गुंडगिरीचा आम्ही धिक्कार करीत असून, त्याचा बंदोबस्त करावा, अशी विनंती आम्ही पोलिसांना केली आहे. त्याविरोधात आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.खासदार राऊत यांच्या मारुती मंदिर येथील संपर्क कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेच्या वेळी आमदार उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी यावेळी उपस्थित होते. खासदार राऊत यांनी नीलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. मंगळवारी रात्री रत्नागिरीत एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात स्वाभिमान पक्ष विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू झाला आहे. या कार्यक्रमात स्वाभिमानच्या कार्यकर्त्याने आमदार उदय सामंत यांची अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा देणारी क्लिप दाखवली. त्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की व मारहाण केली. त्याचे पडसाद बुधवारी रात्री उमटले. शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाचे कार्यालय काही लोकांनी फोडले. त्या प्रकरणी संशयित म्हणून स्वाभिमान पक्षाच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा राजकीय वाद आता वाढू लागला आहे.याबाबत खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांत रत्नागिरी परिसरात दादागिरी, गुंडगिरीचे अनेक प्रकार घडले आहेत. नीलेश राणे पुरस्कृत गुंड प्रवृत्तीच्या भाडोत्री लोकांकडून हे प्रकार घडत आहेत. रत्नागिरी शहर बाजारपेठेत असलेले सेना उपशहरप्रमुख बाबा चव्हाण यांचे दुकान स्वाभिमानच्या लोकांनी फोडले व चव्हाण यांना मारहाण केली. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये माजी खासदार नीलेश राणे व त्यांच्या सहका-यांनी जेवण फुकट दिले नाही म्हणून शिविगाळ व दमदाटी केली, असा आरोप खासदार राऊत यांनी केला. याबाबत  पोलीस त्यांच्या पातळीवर बंदोबस्त करीत असल्याचे सांगितले. नीलेश राणे यांनी गुरुवारी एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘आताच तर आम्ही सुुरुवात केली आहे, आमच्या विरोधात येणा-यांच्या घरात घुसून मारहाण करू, अशी भाषा वापरली आहे. एका माजी खासदाराने असे बोलणे हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे संकेत आहेत. पोलिसांनीही राणे यांचे हे विधान लक्षात घेऊन त्याबाबत योग्य कारवाई करणे आवश्यक आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Nilesh Raneनिलेश राणे