शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: मालदोली खाडीत पाच दिवसांनंतर सापडला नीलेश अहिरेचा मृतदेह, कारण गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:53 IST

पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह शुक्रवारी करंबवणे खाडीत धामणदिवीनजीक सापडला होता

चिपळूण : वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दाम्पत्यामधील नीलेश ब्रह्मण अहिरे याचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनंतर २० किलाेमीटर अंतरावरील मालदोली खाडीत रविवारी सायंकाळी ७:३० सापडला. त्याची पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह शुक्रवारी करंबवणे खाडीत धामणदिवीनजीक सापडला होता. त्यानंतर नीलेश अहिरे याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.शहरातील गांधारेश्वर येथील वाशिष्ठी पुलावरून नीलेश आणि अश्विनी अहिरे या नवदाम्पत्याने नदीत उडी घेतल्याची घटना ३० जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर एनडीआरएफ पथक, पोलिस व अहिरे यांचे नातेवाइक या दोघांचा शोध घेत होते. या शोधमोहिमेत शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी धामणदिवी येथे खाडीकिनारी अश्विनी हिचा मृतदेह सापडला. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यानंतर नीलेशचा शाेध सुरूच हाेता. हा शाेध घेत असतानाच रविवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान उडी मारलेल्या ठिकाणापासून सुमारे २० किलाेमीटर अंतरावरील मालदाेली खाडीत त्याचा मृतदेह सापडला. दरम्यान, याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल याद्वारे आता चिपळूण पोलिसांकडून तपास व चौकशी सुरू आहे.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातया घटनेची माहिती मिळाल्यानंतर साक्री धुळे येथून अनेक नातेवाईक चिपळुणात दाखल झाले, तेही शोधमोहिमेत सहभागी झाले होते. नीलेशचा शोध लागेपर्यंत ही मोहीम सुरू होती. त्यासाठी नातेवाइकांनीही स्वतंत्र बोटीची व्यवस्था केली होती. अश्विनी व नीलेश यांनी आत्महत्येचा निर्णय का घेतला, याविषयी अद्याप उलगडा झालेला नाही.

मित्रमंडळींनाही धक्कानीलेश अहिरे (मूळगाव साक्री, जि. धुळे) हा शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आला होता. चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयातून बारावी पूर्ण केल्यानंतर त्याने मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. याच ठिकाणी स्वत:ची मोबाइल शॉपी सुरू केली आणि ताे चिपळुणातच स्थायिक झाला. त्याच्या आत्महत्येमुळे मित्रमंडळींनाही धक्का बसला आहे.