शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात एनडीआरएफची तुकडी दाखल, अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासह प्रशासनाकडून तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:42 IST

चिपळूण : गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासह मदतकार्य राबविण्यासाठीची प्रशासनाकडून तयारी ...

चिपळूण : गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासह मदतकार्य राबविण्यासाठीची प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) तुकडी मंगळवारी चिपळूण शहरात दाखल झाली.पूरस्थितीत बचावकार्यासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे. त्यासाठीच ही तुकडी दरवर्षीप्रमाणेच यंदाही चिपळुणात आली आहे. या तुकडीमध्ये दोन अधिकारी आणि २३ जवान आहेत. पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांच्याकडून मदत कार्य केले जाणार आहे. येथे २०२१ मध्ये आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झाले. त्यावेळी एनडीआरएफच्या तुकडीची गरज प्राधान्याने पुढे आली. त्या महापुरानंतर दरवर्षी एनडीआरएफची तुकडी पावसाळ्यात चिपळुणात येत आहे. यावर्षी मे महिन्यातच दमदार पावसाला सुरुवात झाल्याने तातडीने एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे.गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्या धर्तीवर येथे एनडीआरएफची तुकडी मंगळवारी सकाळीच दाखल झाली. या तुकडीमध्ये २ अधिकारी व २३ जवानांचा समावेश आहे. शहरातील कापसाळ येथील विश्रामगृहात त्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या तुकडीने मोटार बोटसह इतर आवश्यक बचावकार्याच्या साधनांनी उपलब्धता केली आहे. काही साधने नगर परिषदेने उपलब्ध केली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणRainपाऊस