राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर
By Admin | Updated: October 18, 2016 23:52 IST2016-10-18T23:52:50+5:302016-10-18T23:52:50+5:30
चिपळूण पालिका निवडणूक : पार्लमेंटरी बोर्ड ठरणार कळीचा मुद्दा, उमेदवार नेमके कोण निवडणार?

राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर
सुभाष कदम ल्ल चिपळूण
चिपळूण नगर परिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून, सर्वच पक्ष आजतरी स्वबळाची भाषा करीत आहेत. तरीही सर्वच पक्षात अंतर्गत खदखद सुरु आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण नगर परिषदेत सध्या राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे १२ तर काँग्रेसचे ३ नगरसेवक सत्तेत आहेत. याशिवाय शहर विकास आघाडीचे ५, शिवसेनेचे ४ असे एकूण २४ नगरसेवक आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असून, १३ प्रभागातून २६ नगरसेवक निवडून येणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्याने प्रत्येक पक्ष सतर्क झाला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाची सूत्र माजी आमदार रमेश कदम यांच्याकडे आहेत.
याबाबत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी व आमदार भास्कर जाधव यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. विशेष म्हणजे त्यांच्या अधिपत्याखाली शहर विकास आघाडीचे पाच नगरसेवक पालिकेत सध्या कार्यरत आहेत. माजी आमदार कदम यांनी आपल्याकडे सूत्र असली तरी निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पक्षाकडे ज्यांचे अर्ज येतील, त्यावर पार्लमेंटरी बोर्डात चर्चा होईल आणि क्षमतेनुसार उमेदवारी दिली जाईल. यावेळी कोणावरही अन्याय केला जाणार नाही. असे सूचक वक्तव्य माजी आमदार कदम यांनी केले आहे. शिवाय शहर विकास आघाडीचे जे नगरसेवक निवडून येऊ शकतात, त्यांना संधी देण्यात येईल, असाही दुजोरा त्यांनी दिला आहे. आता शहर विकास आघाडीतील इच्छुक राष्ट्रवादीकडे अर्ज भरणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यांनी राष्ट्रवादीकडे अर्ज भरले तर राष्ट्रवादी एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाईल. परंतु, सध्या तरी आघाडीचे नेते माजी आमदार जाधव यांनी सूचक मौन पाळल्याने त्यांची भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण यावेळीही उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक रंजक ठरणार आहे.
राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी होण्याचीही चर्चा सुरु झाली आहे. परंतु, ही आघाडी काही तांत्रिक मुद्द्यावर फिस्कटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रदेश काँग्रेस कार्यालयात याबाबत चर्चा सुरु असली तरी माजी खासदार नीलेश राणे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी न झाल्यास दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील आणि राष्ट्रवादीकडे इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज आले नाहीत, तर आघाडीचे कार्यकर्तेही आपली वेगळी वाट कायम ठेवतील, असे चित्र आहे.
शिवसेना - भाजप हे दोन प्रमुख विरोधी पक्ष युती करून एकत्र येण्याच्या मनस्थितीत आजतरी नाहीत. मात्र, वरिष्ठ पातळीवर युतीचा निर्णय झाला तर आपण युती मान्य करू, असे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी खासगीत सांगतात. परंतु, या दोन पक्षात सध्या तरी युती होईल, अशी स्थिती नसल्याने दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार निवडण्याची तयारी सुरु केली आहे.
उमेदवारांची चाचपणीही सुरु आहे. शिवाय नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने तोही कळीचा मुद्दा आहे.
एकूणच चिपळूण नगरपरिषदेत सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शहर विकास आघाडी, शिवसेना, भाजप हे सर्व स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टिने सध्या तरी सर्वच पक्षांची प्राथमिक चर्चा सुरु आहे. येत्या चार दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होईल.
ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे. ही लागण सर्वच पक्षांना असल्याने सध्या तरी सर्वच पक्ष सतर्क आहेत. नगर परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच जणांची व्यूहरचना सुरु झाली आहे.
आघाडीतील उमेदवारांनाही योग्य संधी : खेडेकर
राष्ट्रवादीमध्ये कोणतेही गट-तट नाहीत. माजी आमदार रमेश कदम यांच्याकडे सुत्र असली तरी जिल्हाध्यक्ष शेखर निकम व प्रभारी आमदार भास्कर जाधव हे आमचे नेते आहेत. आम्ही सर्व एकदिलाने कार्यरत आहोत. ज्या इच्छुक उमेदवारांचे दि.२१ पर्यंत अर्ज येतील. त्यांच्या दि.२२ रोजी सकाळी ११ वाजता माऊली हॉल खेंड चिपळूण येथे मुलाखती घेवून निवड प्रक्रिया होईल. यापूर्वी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांनी निवडणूक लढविली होती. ते आमच्याच पक्षाचे असल्याने त्यांनीही अर्ज करावेत. त्यांनाही योग्य संधी दिली जाईल. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांनी सांगितले.
युतीची शक्यता फारच कमी : निमकर
भारतीय जनता पक्ष यावेळी नगराध्यक्षांसह सर्वच जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरविणार आहे. पक्षाने त्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. दोन ते तीन दिवसात याबाबतची अधिकृत घोषणा होईल. शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवरुन कोणताही आदेश नसल्याने युतीची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली आहे, असे भाजपच्या शहराध्यक्ष वैशाली मधुकर निमकर यांनी सांगितले.
नीलेश राणेंचा निर्णय मान्य :