शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

..'अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढेल', चिपळुणातील मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 15:55 IST

'सध्याच्या सरकारमध्ये कोणत्याही निवडणुका घेण्याची हिंमत नाही'

चिपळूण : ज्या पक्षाचा आमदार असेल तेथे नगरपालिका निवडणुकीत झुकते माप देण्याची भूमिका महाविकास आघाडीने यापूर्वीच घेतली आहे. आमदार शेखर निकम या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. नगराध्यपद राष्ट्रवादीला असेल तरच आघाडी होईल; अन्यथा राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, अशी भूमिका चिपळुणातील शहर मेळाव्यात घेण्यात आली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवारी शहरातील बांदल हायस्कूल येथील सभागृहात कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला महिलांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, माजी आमदार रमेश कदम यांनी शहर व तालुक्यात मोठा संघर्ष करून राष्ट्रवादी रुजविली. तळागाळापर्यंत संपर्क ठेऊन संघटन वाढविले. आमदारकीच्या काळात असंख्य विकासकामे केली. त्यामुळे मी नशीबवान आहे, मला अधिक संघर्ष करावा लागला नाही, असे ते म्हणाले.पक्ष निरीक्षक बबन कनावजे म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये कोणत्याही निवडणुका घेण्याची हिंमत नाही, म्हणूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचे सांगितले. येत्या काही महिन्यांत पक्षांतर्गत निवडणुका लागतील. त्यामुळे सदस्य नोंदणीकडे लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले.यावेळी विद्यार्थी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, तसेच विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम यांना सर्वात जास्त मतदान करणाऱ्या मुरादपूर विभाग, तसेच पेठमाप-गोवळकोट प्रभागातील मतदान केंद्र परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर माजी नगरसेवक व काँग्रेसचे पदाधिकारी रतन पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.

या मेळाव्याला एम. बदुकवाले, सूचय रेडीज, मिलिंद कापडी, दादा साळवी, शिरीष काटकर, जयंद्रथ खताते, चित्रा चव्हाण, दीपिका कोतवडेकर, पूजा निकम, रिहाना बिलजे, राधिका तटकरे, राजू कदम, रमेश खळे, सीमा चाळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.रमेश कदमांकडे नेतृत्वसंघटना वाढली तरच आपली ताकद वाढेल. नगरपालिकेतील अनुभव पाहता आगामी नगर परिषद निवडणूक ही रमेश कदम यांच्या नेतृत्वाखालीच पार पडेल, असे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीचे नेतृत्व रमेश कदमांकडे जाणार हे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस