शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 15:53 IST

मी शिवसेना ठाकरे गटाचा विभागप्रमुख असलो तरी...

चिपळूण : तालुक्यातील असुर्डे येथे सरपंचपदी झालेला विजयी उमेदवार आमचाच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने केला होता. मात्र, त्यांचा हा दावा खुद्द सरपंच पंकज साळवी यांनीच खोडला आहे. मी शिवसेना ठाकरे गटाचा विभागप्रमुख असलो तरी सरपंच गाव विकास पॅनलचा आहे. माझ्या विजयात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यानेच आपण सरपंच पदावर बहुमताने विजयी झालो असल्याचे नवनिर्वाचित सरपंच पंकज साळवी यांनी दिले आहे.असुर्डे सरपंचपदाच्या निवडणुकीत गावविकास पॅनलकडून पंकज साळवी निवडणूक लढवत होते. गावाने ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून दिले. मात्र, सरपंचपदासाठी एकमत न झाल्याने निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदाच्या निवडणुकीत पंकज साळवी यांनी ४०० मतांनी विजय मिळवला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी सरपंच पदावर दावा केला. मात्र, हा दावा नवनिर्वाचित सरपंच साळवी यांनी खोडून काढला आहे. नवनिर्वाचित सरपंच साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सारेच आता अवाक् झाले असून, त्यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.सरपंच साळवी म्हणाले की, मुळात मी अनेक वर्षे शिवसेनेचे काम करतो आहे. नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विभागप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. मी जरी शिवसेनेचा विभागप्रमुख असलो तरी सरपंच गाव विकास पॅनलचा आहे. माझ्या विजयात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस अशा सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. राजकारण विरहीत निवडणूक आम्ही घेतली आहे. मी सरपंच कोणत्याच पक्षाचा नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या यादीत माझे नाव घेऊ नये, असे सांगितले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsarpanchसरपंचNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना