चिपळूणमध्ये राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत बाण लागून राष्ट्रीय नेमबाज जुई ढगे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 13:36 IST2017-11-25T13:33:17+5:302017-11-25T13:36:23+5:30
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली आहे.

चिपळूणमध्ये राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत बाण लागून राष्ट्रीय नेमबाज जुई ढगे जखमी
रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पुण्याची राष्ट्रीय खेळाडू जुई ढगे हाताला बाण लागून जखमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या विद्यमानाने सब ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेला शनिवारी (25 नोव्हेंबर)डेरवणमध्ये सुरुवात झाली. यात राज्यभरातून अनेक खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एका स्पर्धकाचा सुटलेला बाण स्टेडियमच्या बाहेरून जाणारी पुण्याची नॅशनल खेळाडू तेरा वर्षीय जुई ढगे हिच्या हातात आरपार हातातील घुसून ती जखमी झाली.
जुई ढगेला डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी याबाबतची माहिती दिली. जुई मैदानातून बाहेरून जात असताना हा प्रकार घडला.