शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी दहा वर्षे सत्तेत, मग आतापर्यंत काय...; उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका

By मनोज मुळ्ये | Updated: March 14, 2024 16:26 IST

आम्ही ज्यांच्याशी युती केली होती ती अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांची भाजप होती

गुहागर : गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. पण देश विकसित करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत पुढच्या निवडणुकीची तारीख देतात. दहा वर्षे ते सत्तेत आहेत, मग आतापर्यंत ते काय गवत उपटत होते का, असा प्रश्न करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे ठाकरे यांची सभा गुरुवारी झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, माजी केंद्रीय मंत्री आणि येणा-या लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. बुधवारी ते रत्नागिरी जिल्ह्यात आले. सकाळच्या सत्रात शृंगारतळी तर दुपारच्या सत्रात त्यांनी गुहागर येथे बैठक घेतली.

भाजपचे हिंदुत्त्व शिव्यांचेआम्ही ज्यांच्याशी युती केली होती ती भाजप अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांची भाजप होती. आताची भाजप वेगळी आहे. या भाजपचे हिंदुत्त्व वेगळे आहे. आमचे हिंदुत्त्व ओव्यांचे आहे, तर या भाजपचे हिंदुत्त्व शिव्यांचे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. भाडोत्री जनता पार्टीसह भाजपचे अनेक उल्लेख त्यांनी केले.

दहा वर्षेत ते सत्तेत राहून ते काय..देश विकसित करायचा आहे, असे ते प्रत्येक निवडणुकीत सांगतात. प्रत्येकवेळी पुढच्या निवडणुकीची तारीख देतात. आतापर्यंत दहा वर्षे ते पंतप्रधान आहेत. अजूनही देश केवळ विकसनशील असेल तर दहा वर्षेत ते सत्तेत राहून ते काय फक्त गवत उपटत आहेत का, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. भाषणाच्या सुरुवातीला ठाकरे यांनी शिवसेना सोडून गेलेल्या लोकांवर टीका केली. आपला पक्ष, बाप चोरणा-या लोकांना आपले शिवसैनिकच पराभूत करतील, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी