शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

Narayan Rane: नारायण राणेंना मोठा धक्का, कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कारवाई अटळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 2:29 PM

Narayan Rane: नारायण राणे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहेत.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले आहे. या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंना अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली होती. दरम्यान, नारायण राणे यांना कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई अटक आहे. मात्र नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टाच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. (Narayan Rane's bail application rejected by court)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले होते.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय