शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 19:25 IST

Crimenews Chiplun Police Ratnagiri : चिपळूण शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम येथील पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

ठळक मुद्देपरिचारिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात चिपळूण पोलिसांना मोठे यश, दोन दिवसांत काढले शोधून खेड तालुक्यातील लवेल येथील भंगार व्यावसायिक असलेल्या या नराधमाला रविवारी रात्री अटक केली.

चिपळूण : शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम येथील पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. खेड तालुक्यातील लवेल येथील भंगार व्यावसायिक असलेल्या या नराधमाला रविवारी रात्री अटक केली. अवघ्या तीन दिवसांत येथील पोलिसांनी या आरोपीला पकडल्याने त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. चार दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात एका २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अत्याचार करणारा नराधम पसार झाला होता. पोलिसांनी संबंधित नराधमाचा शोध घेण्यासाठी दोन पथकांच्या माध्यमातून मोहीम राबवली. यामध्ये पोलिसांना मध्यवर्ती बसस्थानक व भोगाळे येथील दीपक लॉज समोरील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते.पीडित तरुणीने वर्णन केल्याप्रमाणे एक तरुण त्यामध्ये कैद झाला होता. त्यामुळे संबंधित तरूणाच्या हालचाली व चालण्याच्या पद्धतीवरून पोलीस त्याचा शोध घेत होते. याचवेळी दुसरे पथक पीडित तरुणीचा मोबाईल व छत्री घटनास्थळावरून गायब झाल्याने त्या नराधमानेच नेली असावी, अशी शंका घेत त्या मोबाईलचे लोकेशन तपासले. तर ते लोकेशन खेड तालुक्यातील सात्विनगाव व लवेल दरम्यान आढळले.त्याप्रमाणे येथील पोलिसांनी आपल्या तपासाचा मोर्चा लवेलच्या दिशेने वळवला. यावेळी एका व्यक्तीने भंगारवाल्याच्या तीन मुलांपैकी मोठा मुलगा या पद्धतीने दिसतो, असे सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित भंगरवल्याकडे काही बोगस व्यक्ती पाठवून त्या तरूणाच्या हालचाली व आवाज टिपला. तीनवेळा अशा पद्धतीने प्रयोग केल्यानंतर तोच असल्याची पोलिसांची खात्री पटली. अखेर रविवारी रात्री त्याला अटक केली. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी बजावली.व्यक्ती विवाहित, आठ महिन्यांची मुलगीआरोपी हा विवाहित असून, त्याला आठ महिन्याची मुलगीही आहे. घटनेच्या दोन दिवस आधी तो तीन हजार रुपये घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर मुंबई एसटीने पनवेल येथे गेला होता. पुन्हा मुंबई येथून तो बसने गुरुवारी दुपारी चिपळुणात आला. सायंकाळी तो बस स्थानकाच्या आवारात फिरत होता. त्यानंतर त्याने संबंधित पीडित तरुणी रस्त्याने एकटी जात असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChiplun Police Thaneचिपळूण पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी