मुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:22 PM2019-07-03T12:22:05+5:302019-07-03T12:23:21+5:30

मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

Mumbai's highway collides with Konkan Railway | मुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्द

मुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्द

Next
ठळक मुद्देमुंबईतील अतिवृष्टीचा कोकण रेल्वेला फटका, चार गाड्या रद्दजनशताब्दी, तेजस एक्सप्रेस रद्द; तुतारी १४ तास उशिरा

रत्नागिरी : मुंबईत सोमवारी रात्री पावसाने कहर केला आणि पुढील २४ तास कोकण रेल्वेची वाट बिकट करून टाकली. मंगळवारी दुपारपर्यंत कोकण रेल्वेची धाव पनवेलपर्यतच होती. कोकण रेल्वे मार्गावरील ४ महत्वाच्या गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली एक्सप्रेस व दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे. बुधवारच्या मुंबईतून सुटणाऱ्या तेजस व जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी तुतारी एक्सप्रेस तब्बल १४ तास उशिराने धावत होती.

१९७४ नंतर मुंबईत पावसाने कहर केला असून मुंबई शहर पावसाच्या पाण्यात असल्यासारखी स्थिती आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाºया अनेक गाड्या या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर येथून सुटतात. मात्र मुंबई शहरात सोमवारी मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत पाणीच पाणी झाले. लोकल रेल्वेसेवाही मंगळवारी दुपारपर्यंत कोलमडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाºया तीन गाड्या रद्द मंगळवारी रद्द करण्यात आल्या.

मुंबईत कोकण रेल्वे मार्गावरील अन्य गाड्याही नेता येत नसल्याने त्या मंगळवारी दुपारपर्यंत पनवेलला थांबविल्या जात होत्या. दुपारनंतर या गाड्यांची वाहतूक मुंबईतून सुरू झाली. १ जुलैची रेल्वे क्र.१२६२० मंगलूरू-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेलपर्र्यंतच धावली. १२६१९ क्रमांकाची मत्स्यगंधा एक्सप्रेस दुपारनंतर मंगलूरू येथे रवाना झाली. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक गाड्या मंगळवारी १ ते १४ तास उशिराने धावत होत्या.

१६३३४ वेरावळ एक्सप्रेस पावणेदोन तास उशिराने धावत होती. १२४५० गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस तीन तास उशिराने धावत होती.१९४२४ हमसफर गाडी ६ तास, २२६५४ निझामुद्दीन त्रिवेंद्रम साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ६ तास, ५०१०५ दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडी दीड तास उशिराने धावत होती.

अतिवृष्टीने मुंबईकरांचे हाल बेहाल झालेले असतानाच कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी क्र.११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या माहितीनुसार तब्बल १४ तास उशिराने धावत होती. ही गाडी त्यावेळी कोलाड येथून सावंतवाडीच्या दिशेने निघाली होती. या गाडीला उशिर झाल्याने ताटकळत बसलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाल्याने व मुंबईत पाणी तुंबल्याने कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत होता. एरव्ही गजबजलेल्या रत्नागिरी स्थानकातही शुकशुकाट होता. प्रवासात अडकायला नको म्हणून अनेकांनी उशिराने धावत असलेल्या गाड्यांनी जाणे टाळले. चार महत्वाच्या गाड्या रद्द झाल्याने सर्वच प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.

Web Title: Mumbai's highway collides with Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.