शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai-Goa National Highway : नितीन गडकरींच्या आश्वासनानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 13:01 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे.

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरकीरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. याप्रश्नी महाविकास आघाडीने चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

हातखंबा, पाली, चिपळूण, लांजा आणि राजापूर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला होता. महामार्ग रोखणार्‍या शिवसैनिकांना यावेळी पोलिसांनी  ताब्यात घेतले.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. त्यामागून मंजूर झालेला समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला आहे. ठेकेदार व अधिकारी सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. याप्रश्नी काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवण्यासाठी आज, गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालूकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलींद कापडी, कॉंग्रेस तालूकाध्यक्ष प्रशांत यादव, लियाकत शाह यांनी सहभाग घेतला.वाकेड ते आरवली हे दोन टप्पे प्रामुख्याने रखडले असून, या क्षेत्रात नऊ ते दहा टक्केच कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महामार्गाच्या कामाबाबत जनतेकडून संताप व्यक्त होत असल्याने केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गShiv SenaशिवसेनाNitin Gadkariनितीन गडकरी