शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

मुंबई-गोवा महामार्ग : चौपदरीकरणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 4:14 PM

फक्त फोटो अन् ढोबळ उत्तरे नकोत, चौपदरीकरण कामाचे रोजचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व ते स्वतंत्र संकेतस्थळावर अपलोड करुन जनतेसाठी खुले करा, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. ओवेस पेचकर यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने हा आदेश दिला. खड्डे पावसाळ्यापूर्वीच भरा, असेही न्यायमूर्तींनी ठणकावले.

ठळक मुद्देमुंबई-गोवा महामार्ग : चौपदरीकरणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करामुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

चिपळूण : फक्त फोटो अन् ढोबळ उत्तरे नकोत, चौपदरीकरण कामाचे रोजचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व ते स्वतंत्र संकेतस्थळावर अपलोड करुन जनतेसाठी खुले करा, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. ओवेस पेचकर यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने हा आदेश दिला. खड्डे पावसाळ्यापूर्वीच भरा, असेही न्यायमूर्तींनी ठणकावले.चिपळूणचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे नामवंत वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण तसेच या महामार्गाच्या परिस्थितीबाबत उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. यापूर्वीही या याचिकेवर वेळोवेळी सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने संबंधित प्रशासन व राज्य सरकारला या विषयात चांगलेच फटकारले होते व योग्य त्या सूचनाही दिल्या होत्या. नुकतीच या याचिकेवर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ते पेचकर यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर न्यायालयाचे लक्ष वेधले.मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्याचा त्रास भोगावा लागत आहे. विहीत मुदतीत हे काम होत नाही. तसेच महामार्गावरील खड्डे अद्याप आहेत तसेच आहेत. असे अनेक मुद्दे ओवेस पेचकर यांनी यावेळी उपस्थित करून वस्तुस्थिती न्यायालयाच्यासमोर आणून दिली. फक्त कामाचे फोटो दाखवण्यापेक्षा या कामाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सर्वसामान्यांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.उत्तरे अन् फोटो नकोतमुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने संबंधित यंत्रणेला चांगलेच सुनावले. फक्त ढोबळ उत्तरे व फोटो नकोत, तर कामाचे रोजचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा व स्वतंत्र संकेतस्थळ तयार करून व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून घ्या, असे न्यायमूर्तींनी सांगितले.खड्डेही त्वरित भराकामाच्या ठिकाणी योग्य निर्देश देणारे फलक, रात्रीच्या वेळी दिवे, गस्ती वाहने, रूग्णवाहिका अशा उपाययोजना तैनात ठेवण्यात आल्या आहेत का? असा प्रश्न ही न्यायमूर्तींनी उपस्थित केला. संगमेश्वर व कशेडी दरम्यान पावसाळ्यापूर्वी हे खड्डे भरले गेले, असेही न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी