शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

महामार्गावरील खड्डेप्रश्नी मनसेची टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती

By अरुण आडिवरेकर | Updated: August 26, 2022 17:01 IST

महामार्गाचे अर्धवट काम आणि पडलेले खड्डे यामुळे वाहने चालविणे मुश्किल झाले

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील पाली (मठ) येथे महामार्गावरच आंदाेलन केले. प्रतिकात्मक गणपती विराजमान करुन पदाधिकाऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती केली.मुंबई - गाेवा महामार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गाचे अर्धवट काम आणि पडलेले खड्डे यामुळे वाहने चालविणे मुश्किल झाले आहे. गणेशाेत्सवासाठी मुंबईकर माेठ्या प्रमाणात गावी येणार असून, त्यांचा प्रवास सुखकर हाेण्यासाठी मनसेतर्फे आंदाेलन करण्यात आले. महामार्गावरील पाली (मठ) येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महाआरती केली.त्यानंतर प्रतिकात्मक गणेशाच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी महामार्गाची युद्धपातळीवर डागडुजी करण्याची मनसेच्या दक्षिण रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली.जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, दक्षिण रत्नागिरी संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, लांजा तालुकाध्यक्ष मनोज देवरुखकर, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव सहभागी झाले हाेते. तसेच मनकासे जिल्हा चिटणिस सुनील साळवी, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, महेश मयेकर, लांजा शहर अध्यक्ष दिलीप लांजेकर, महिला शहर अध्यक्ष स्वरा राजेशिर्के, अखिल शाहू, अजिंक्य केसरकर, जयेश फणसेकर, सोम पिलणकर तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील अनेक मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMNSमनसे