शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:54 IST

mahavitaran Bhaskar Jadhav Ratnagiri-मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा, अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

ठळक मुद्दे महावितरणकडून एक गाव एक दिवस, उपक्रमाचा गुहागरात शुभारंभ ग्राहकांना सन्मानाची वागणूक देऊन साचेबध्द उत्तर देऊ नका-भास्कर जाधव

असगोली : मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणचीरत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा, अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.गुहागर पंचायत समितीच्या सभागृहात शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. महावितरणचे गणेश गलांडे यांनी ह्यएक गाव एक दिवसह्ण उपक्रमाची माहिती दिली. वीज ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्या. साचेबंद उत्तर देऊन त्याला परत पाठवू नका. वीज अपघातानंतर जबाबदारी स्वीकारा, अशा सूचना भास्कर जाधव यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.या वेळी सभापती विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, अतिरिक्त गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, सीताराम ठोंबरे, विनायक मुळे नगरसेविका नीलिमा गुरव, मृणाल गोयथळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे, आबलोलीच्या सहाय्यक अभियंता जयश्री माळकर, रानवीचे सहाय्यक अभियंता बसवराज कलशेट्टी, गुहागरच्या कनिष्ठ अभियंता प्रियांका वाठोरे, शृंगारतळीतील सहाय्यक अभियंता सनी पवार, तळवलीचे कनिष्ठ अभियंता रोहित दाबेराव, पालशेतच्या सहाय्यक अभियंता सुमित्रा सपकाळ उपस्थित होते. प्रास्ताविक जयश्री माळकर यांनी केले.कोकणासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावाकोकणाला न्याय द्यायचा असेल तर या उपक्रमाबरोबरच स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा लागेल. आमच्याकडे थकबाकी नाही. महाराष्ट्राला केंद्र सरकाच्या अर्थसंकल्पातून, निती आयोगातून निधी कमी मिळतो, कारण आपल्याकडे थकबाकी नाही आणि सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळतो. तीच परिस्थिती कोकणाची. आमच्याकडे विजेची, कर्जाची थकबाकी नाही. म्हणून आमच्याकडे विकासाबाबत दुर्लक्ष केले जाते. हा विषय आकडेवारीनिशी सरकारकडे मांडावा, अशी मागणी केली पाहिजे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे, अशीही सूचना भास्कर जाधव यांनी केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरी