महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, चाैघांविराेधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:59+5:302021-05-21T04:31:59+5:30

रत्नागिरी : विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकारणी चार जणांविरोधात जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

MSEDCL employees beaten up, case filed against Chaigha | महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, चाैघांविराेधात गुन्हा दाखल

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, चाैघांविराेधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकारणी चार जणांविरोधात जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील कोळीसरे फाटा येथे बुधवारी सकाळी ५.१५ वाजता घडली.

या मारहाणप्रकरणी केशव बुधाजी लेंडे (५२, रा. आगरनरळ फाटा, रत्नागिरी) यांनी जयगड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार नितीन सावंत, अमित पवार, अनिकेत सावंत, रूपेश सावंत (सर्व रा. कोळिसरे, रत्नागिरी) यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव लेंडे हे बुधवारी सकाळी विद्युतवाहिनीचे काम करत हाेते. त्यावेळी चाैघेजण तेथे आले आणि त्यांनी मुख्य वाहिनीवरील दुरुस्ती केल्याशिवाय गावातील दुरुस्ती करता येणार नाही, असे सांगितले. तेव्हा त्यांचे काहीही ऐकून न घेता चाैघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे करत आहेत.

Web Title: MSEDCL employees beaten up, case filed against Chaigha