शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात पाच किलोहून अधिक गांजा जप्त, सावर्डेतील महिला ताब्यात

By संदीप बांद्रे | Updated: June 1, 2024 16:38 IST

चिपळूण : शहर व परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे रॅकेटच पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. खेर्डी बाजारपेठेतील टपरी विक्रेत्या ...

चिपळूण : शहर व परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे रॅकेटच पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. खेर्डी बाजारपेठेतील टपरी विक्रेत्या कडून गांजाच्या ११ पुड्या जप्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी सावर्डे पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेत तिच्या घरातून पाच किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. मीनाक्षी बाळू जयस्वाल (वय ५१, सावर्डे बाजारपेठ, जिल्हा परिषद, मराठी शाळे ) असे ताब्यात घेतलेले महिलेचे नाव आहे.

त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी मोहीम येथील पोलिसांनी आणखी तीव्र केली असून या प्रकरणाच्या मुळाशी पोहचण्याचा प्रयत्न येथील पोलीस यंत्रणेने सुरु केला आहे. या मोहिमेमुळे गांजा विक्रेत्यांसह अंमली पदार्थ विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहेत. खेर्डी माळेवाडी येथील रहिवासी असलेला साईराज कदम याच्या चौकशीत गांजाच्या ५० ग्रॅम वजनाच्या ११ पुड्या शुक्रवारी आढळून आल्या. सुमारे २२०० रूपये किमतीचा हा गांजा जप्त केला. त्यापाठोपाठ सावर्डे पोलिसांनाही मीनाक्षी जयस्वाल हिच्या विषयी गोपनीय माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे सावर्डे पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शनिवारी सकाळी सापळा रचून मीनाक्षी जयस्वाल हिला ताब्यात घेतले. तसेच तिच्या घराची झडती घेतल्या नंतर तेथे पाच किलो पेक्षा अधिक गांजा आढळून आला.चिपळूण शहरात अजूनही पारंपरिक पध्दतीने गांजा विक्रीचा व्यवसाय केला जातो. या व्यवसायात आता काही महिलाही पुढे आल्या आहेत. गतवर्षी पकडलेल्या चार मुलांनी शहरातील पाग भागातील एका बॉडी बिल्डरला ताब्यात घेतले होते. त्याचवेळी गांजा विक्रीमध्ये एक दोन महिलाही सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याही तरुणांना अमिष दाखवून गांजाचा पुरवठा करत होत्या.

फरशीतिठा परीसरातील एक महिला शहरातील गोवळकोट परिसरात गांजा पुरवठा करत असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली होती. मात्र आता सावर्डे येथे महिला गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे तात्काळ सावर्डे पोलिसांनी कारवाई करून मीनाक्षी जयस्वाल हिला ताब्यात घेत गांजा जप्त केला आहे. सावर्डे पोलिसांची ही कारवाई उशिरा पर्यंत सुरु होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस