शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी घेतले पैसे, रत्नागिरीत एकाला ५३ लाखांचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:14 IST

रत्नागिरी : जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी तब्बल ५३ लाख १३ हजार ५०० रुपयांची मागणी करत रत्नागिरीतील एकाला ऑनलाइन गंडा ...

रत्नागिरी : जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी तब्बल ५३ लाख १३ हजार ५०० रुपयांची मागणी करत रत्नागिरीतील एकाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दाेघांवर रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना ५ मे २०२२ रोजी दुपारी २:३१ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत मिरकरवाडा येथे घडली आहे.या फसवणुकीप्रकरणी अलताफ हशमत साखरकर (३६, मूळ रा. रहबहर मोहल्ला साखरतर, सध्या रा. धनजी नाका, रत्नागिरी) यांनी सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार, अब्दुलसमद अलीमिया जयगडकर (रा. कोहिनूर प्लाझा, मांडवी रोड, रत्नागिरी) आणि प्रमिला हिंदूराव माटेकर ऊर्फ आयु पाटील (रा. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार ५ मे २०२२ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे घडला. अब्दुलसमद जयगडकर आणि प्रमिला माटेकर यांनी अलताफ साखरकर यांना सना शेख नावाची व्यक्ती जिवंतच नसताना तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे खोटे सांगितले.

त्यानंतर दाेघांनी साखरकर यांच्याकडून वेळोवेळी एकूण ५३ लाख १३ हजार ५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यास भाग पाडले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अलताफ साखरकर यांनी प्रमिला माटेकर या महिलेकडे आपले पैसे परत मागितले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने त्यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार दाेघांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (२), ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेची धमकीसाखरकर यांनी प्रमिला माटेकर हिच्याकडे पैशांची मागणी करताच तिने माझ्या राजकारणात खूप ओळखी आहेत. तसेच मुस्लीम लोक माझ्या घरी येऊन पैशांची मागणी करतात, असा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस