खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील मोकाट पाळीव जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. पाळीव जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या चालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याने उनाड जनावरे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आधीच अडथळे निर्माण झाले आहेत. या अडथळ्याची शर्यत पार करत वाहनचालक कसेतरी मार्गक्रमण करत आहेत. मात्र, महामार्गावर मधोमध बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे हा मार्ग आणखीनच खडतर झाला आहे.खेड - चिपळूण दरम्यानच्या प्रवासादरम्यान औद्योगिक वसाहतीतून जाणारा महामार्ग या जनावरांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनला आहे. लोटे परिसरात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एका बाजूने पूर्ण झाले आहे. त्यामुळे या परिसरात चालकांना अडचण भासत नाही.जनावरांमुळे काहींना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे तर काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत. उनाड जनावरांचा योग्य तो बंदोबस्त केला नाही तर महामार्गावरील अपघाताचा धोका वाढणार आहे.
महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:00 IST
Ratnagirinews, Khed), Accident. highway मुंबई - गोवा महामार्गावरील मोकाट पाळीव जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. पाळीव जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या चालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली जात नसल्याने उनाड जनावरे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या
ठळक मुद्देमहामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या महामार्गावरील अपघाताचा धोका वाढणार